महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात पोलिसांसाठी कोविड रुग्णालयाची निर्मिती - सोलापूर कोरोना अपडेट

कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार करण्यासाठी सोलापुरात पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे रुग्णालय फक्त एका आठवड्यात उभारण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयातील पोलीस पब्लिक स्कुलचे रुपांतर कोविड रुग्णालयात करण्यात आले आहे. या रुग्णालयामध्ये 60 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 60 बेडच्या कोविड सेंटरची निर्मिती
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 60 बेडच्या कोविड सेंटरची निर्मिती

By

Published : Apr 24, 2021, 5:06 PM IST

सोलापूर -कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार करण्यासाठी सोलापुरात पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे रुग्णालय फक्त एका आठवड्यात उभारण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयातील पोलीस पब्लिक स्कुलचे रुपांतर कोविड रुग्णालयात करण्यात आले आहे. या रुग्णालयामध्ये 60 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. सोलापुरात 12 एप्रिल 2020 मध्ये प्रथम रुग्ण आढळला, तेंव्हापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतच चालले आहेत. कोरोनाकाळापासून शाळा बंद असल्याने या इमारतीचे कोविड रुग्णालयात रुपांतर करण्यात आले आहे. एकीकडे शहरात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे बेड आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. अनेक रुग्ण बेडसाठी आणि ऑक्सिजनसाठी भटकत आहेत. ही वेळ पोलिसांवर येऊ नये, म्हणून सोलापूरमध्ये पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी कोविड रुग्णालये उभारण्यात आले आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 60 बेडच्या कोविड सेंटरची निर्मिती

कोविड रुग्णालयात ऑक्सिजनसह सेमी व्हेंटिलेटरची सुविधा

पोलिसांसाठी पोलीस मुख्यालयात असलेल्या शाळेचे रुपांतर कोविड रुग्णालयात करण्यात आले आहे. या शाळेत 60 बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्व बेडसाठी ऑक्सिजनची सुविधा उलब्ध करण्यात आली आहे. या रुग्णालयात 2 सेमी आयसीयु तसेच 4 जनरल वार्ड आहेत. शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराला या सेवेचा लाभ घेता येणार आहे. पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या परिवारावर या रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहे. हे रुग्णालय अवघ्या आठवड्याभरात उभारण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे यांनी दिली.

हेही वाचा -जस्टीस नूथलपती वेंकट रमना भारताचे नवे सरन्यायाधीश

ABOUT THE AUTHOR

...view details