काँग्रेस पक्षाच्या महानिर्धार मेळाव्यात नाना पटोलेंचे भाषण सोलापूर :काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी सोलापूर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीला मिळाला पाहिजे. कारण 2014 व 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला आहे, असे विधान केले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी आगामी काळात सोलापूर लोकसभा मतदार संघातून सुशीलकुमार शिंदेच खासदार असतील, असे विधान केले आहे. काँग्रेस पक्षाचा महानिर्धार मेळावा रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला. यावेळी नाना पटोले बोलत होते.
इथे कुणीही 'भुट्टा' येईल आणि काहीही सांगून जाईल, त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका- नाना पटोले
काँग्रेसचा खासदार पाहिजे : नाना पटोले म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे हे खासदार असले पाहिजेत, असे तुम्ही म्हणतात. पण, ते निवडणूक लढायला तयार नाही, असे मला त्यांनी सांगितले. तुमची इच्छा असेल तर शिंदे निवडणुकीत उभे राहतील. सुशीलकुमार शिंदे हे दोनवेळा पराभूत झाले आहेत. आगामी काळात मात्र शिंदे हे बहुमताने निवडून आले पाहिजे, ही जबाबदारी तुम्ही घ्या असे आवाहन नाना पटोले यांनी महामेळाव्यात केले. मला फक्त सोलापूर लोकसभेची जागा नव्हे, तर माढा मतदार संघातून देखील काँग्रेसचा खासदार पाहिजे असे नाना पटोले यांनी विधान केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, आमदार नसीम खान, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, अस्लम शेख, शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, आमदार प्रणिती शिंदेसह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
भाजपाचा मासा काँग्रेसच्या गळाला :सोलापूरच्या भारतीय जनता पार्टीला सोलापुरात जबरदस्त धक्का बसला आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी यांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अशोक निंबर्गी यांनी भाजपमध्ये अनेक वर्षे शहर अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने, आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला याची किंमत मोजावी लागेल. तसेच अशोक निंबर्गी यांनी भाषण करताना, भाजपमध्ये काय अजेंडा चालतो, कशा प्रकारे अंतर्गत राजकारण आहे, हा वाद चहावाट्यावर आणला. त्याला कंटाळून भाजप सोडत आहे, असा अशोक निंबर्गी यांनी खुलासा केला.
हेही वाचा :
- Jayant Patil : जयंत पाटील यांची आज होणार ईडी चौकशी; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची कार्यालयाबाहेर घोषणाबाजी
- Governor Ramesh Bais : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करावा; राज्यपाल रमेश बैस
- PM Modi Meets The Governor General : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली पापुआ न्यू गिनीच्या गव्हर्नर जनरलची भेट