सोलापूर - सोलापूरचे पालकमंत्री महाराजांच्या नादी लागून भविष्यवेत्ते झाले वाटते, असे म्हणत काँग्रेसच्या नेत्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना 'कुडमुड्या जोशा'ची उपमा दिली आहे. पालकमंत्री देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडताना शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आणि प्रांतिक सदस्य प्रकाश यलगुलवार यांनी उपरोधिक शब्दात त्यांचा समाचार घेतला.
महाराजांच्या नादी लागून पालकमंत्री भविष्यकार झाले काय? - sushilkumar
काँग्रेसच्या नेत्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना 'कुडमुड्या जोशा'ची उपमा दिली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ. जयसिद्धयेश्वर महाराज आणि वंचित बहुजन आघाडीकडून अॅड. प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे निवडणुकीला उभे राहतील का? अशी शंका भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी उपस्थित करत काँग्रेसला खिजवले होते. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि प्रांतिक सदस्य प्रकाश यलगुलवार यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना लक्ष्य केले.
सोलापुरात लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसा नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसत आहे. भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे सामान्य सोलापूरकरांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.