महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या छळाला कंटाळून राजीनामा; रणजितसिंह निंबाळकरांचे स्पष्टीकरण - ncp

देशात राज्यात आघाडी असूनदेखील फलटणमध्ये राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची साधी ग्रामपंचायतीची कामे होत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या छळाला कंटाळून सातारा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे निंबाळकरांनी सांगितले.

सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्षाचा राजीनामा

By

Published : Mar 24, 2019, 10:13 AM IST

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या छळाला कंटाळून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे स्पष्टीकरण सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी दिले आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर रणजितसिंह निंबाळकर हे सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना भाजपकडून माढ्यातील उमेदवारी निश्चित असल्यामुळेच निंबाळकर हे माढा मतदार संघात फिरत आहेत. म्हणून करमाळ्याचे शिवसेना आमदार नारायण पाटील यांची त्यांनी जेऊर येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्षाचा राजीनामा

देशात राज्यात आघाडी असूनदेखील फलटणमध्ये राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची साधी ग्रामपंचायतीची कामे होत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या छळाला कंटाळून सातारा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे निंबाळकरांनी सांगितले. त्यांनी माढ्याची उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. करमाळ्याचे शिवसेना आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली यावेळी धैर्यशील मोहिते-पाटील उपस्थित होते.
माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा विधानसभा मतदारसंघ आहे. करमाळामधून शिवसेनेचे आमदार नारायण पाटील हे मोहिते-पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. मोहिते-पाटील हे भाजपमध्ये आल्यामुळे आमदार नारायण पाटील हे आता मित्र पक्ष असलेल्या भाजपला मदत करणार हे उघड असले तरी इच्छूक उमेदवार म्हणून रणजित निंबाळकर यांनी शिवसेना आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली.
यावेळी निंबाळकर म्हणाले, की माढा लोकसभा मतदारसंघातील माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला येथील मित्रांनी मिळून आघाडी केली होती. मात्र, तेच राष्ट्रवादीचे उमेदवार झाले. काँग्रेसने आपणास भरपूर दिले मी काँग्रेसवर नाराज नाही. राष्ट्रवादीच्या छळाला कंटाळून काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचा छळ असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे रामराजे निंबाळकरांकडे बोट दाखवत सोमवारी ते भाजपात प्रवेश करणार आहेत. निंबाळकरांच्या भाजप प्रवेशामुळे संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर अशी लढत होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details