पंढरपूर -शहरात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीला व्यापारी महासंघाकडून तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी व व्यापाऱ्यांमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधिकारी व व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. अप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे बैठक निष्फळ ठरली. पंढरपुरातील व्यापाऱ्यांच्या भावना जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यासमोर मांडणार असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले.
- पंढरपुरात 13 ऑगस्टपासून संचारबंदी -
कोरोना साखळी तोडण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यात जिल्हा प्रशासनाकडून 13 ऑगस्टपासून संचारबंदी लागू केली आहे. कोरोनामुळे पंढरपुरातील व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती मंदावली आहे. त्यातून आता पंढरपुरात होणाऱ्या संचारबंदीला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रेटही कमी आहे. त्यामुळे प्रशासनाने संचारबंदीबाबत फेरविचार करावा. अन्यथा 13 ऑगस्टपासून दुकाने उघडण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला. मात्र, अधिकारी व व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे
- अप्पर जिल्हाधिकारी व व्यापारी प्रतिनिधींची बैठक निष्फळ -