सोलापूर-दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. या घटनेची मंत्री सुभाष देशमुख यांनी तात्काळ दखल घेत मृत झालेल्या कुटुंबियांच्या दुःखात सामील असल्याचे सांगून, जखमींची विचारपूस केली. जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले.
वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना लवकरच मदत - सुभाष देशमुख - ANNOUNCED
मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात असल्यामुळे फोनवरून तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या समवेत सदर घटनेविषयी चर्चा करून तत्काळ पंचनामे करून सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासनाकडून देखील लवकरच मदत देण्यात येईल असे सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले.

मंद्रूपमध्ये वीज पडल्याने धक्कादायक घटना घडली. वीज पडून तिघांचा मृत्यू, दोघे जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. पंतूसिंग रजपूत, संकेत चौरमोले, पार्वती कोरे अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत रविकांत मुळे व धरेप्पा म्हेत्रे हे दोघे जखमी झाले आहेत.