महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मकर संक्रांतिनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास

मकर संक्रांतीच्या सणाला महिला रुक्मिणी मातेला वाण देण्यासाठी पंढरपूरच्या मंदिरात येतात. यावर्षीही महिला मंदिरात दाखल झाल्या आहेत. पुण्यातील एका भाविकाच्या सौजन्याने मंदिर परिसरात फुलांची आकर्षत सजावट करण्यात आली आहे.

vitthal-rukmini
विठ्ठल-रुक्मिणी

By

Published : Jan 14, 2021, 10:13 AM IST

Updated : Jan 14, 2021, 5:25 PM IST

सोलापूर (पंढरपूर) -मकर संक्रांती निमित्त आज विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा व मंदिराचे प्रवेशद्वार आकर्षक दिसत होते. ही सजावट पुण्याचे भाविक नवनाथ भिसे ह्यांच्या तर्फे करण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच महिलांनी मंदिरात गर्दी केली आहे.

मकर संक्रांतिनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली

सजावटीने मंदिर खुलले -

विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभाऱ्यात व मंदिरातील प्रवेद्वारावर तुळस, ‌अ‌ॅस्टर, जरबेरा, झेंडू, शेवंती, कार्नेशन, ऑर्किड, बिजली, ग्लॅडीओ या फुलांपासून सजावट करण्यात आली आहे. या शिवाय सोळखांबी, सभा मंडप आणि मंदिराच्या विविध भागात देखील सजावट आहे. मंदिरात आज विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला दागिन्याने सजवण्यात आले आहे. रांगोळी कलाकार संतोष आढळेग यांनी रांगोळीतून श्री विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा साकारली आहे.

संक्रांतीचे वाण वाटप करताना महिला

रुक्मिणी मातेचे वाण देण्यासाठी महिलांची गर्दी -

रुक्मिणी मातेला सुवासिनी महिलांनी नवधान्याचे वाण अर्पण करण्यासाठी गर्दी केली आहे. मंदिर समितीने खास महिलांसाठी दर्शनाची वेगळी व्यवस्था केली असून हजारो महिला भाविक आज पहाटेपासून ताटात हळद , कुंकू , तिळगुळ आणि शेतात आलेले ऊस , बोर, गाजर, हुरडा यासह सर्व प्रकारचे धान्य अर्पण करण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या आहेत. मात्र, कोरोना महामारीमुळे फक्त पाच हजार भाविकांना विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेता येणार आहे.

Last Updated : Jan 14, 2021, 5:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details