महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासगी रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सिजन प्लांट उभारावेत : जिल्हाधिकारी-मिलींद शंभरकर - collector millind shamabharkar news

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या निदानासाठी व ऑक्सिजनच्या सुयोग्य वापरासंदर्भात खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला.

collector ordered to private hospital to produce own oxygen plant
खासगी रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सिजन प्लांट उभारावेत : जिल्हाधिकारी-मिलींद शंभरकर

By

Published : May 6, 2021, 10:55 PM IST

सोलापूर- पंढरपूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांना तात्काळ आवश्यक उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आली आहेत. परंतु भविष्यातील परस्थितीचा विचार करुन जादा खाटांची संख्या असलेल्या खासगी रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सिजन प्लांट उभारावेत अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी शंभरकर यांचा आढावा

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या निदानासाठी व ऑक्सिजनच्या सुयोग्य वापरासंदर्भात खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम यांच्यासह तालुक्यातील खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर, निमा संघटनेचे डॉक्टर उपस्थित होते.

ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर उभारा

जादा खाटांची रुग्ण संख्या असलेल्या खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी आवश्यक त्या प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत. रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्या ठिकाणी कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे रुग्णालयात गर्दी होणार नाही यांची दक्षता संबधित रुग्णालयांनी घ्यावी. रुग्णालयाचे फायर ऑडीट, ऑक्सिजन ऑडीट, इलेक्ट्रीक ऑडीट करुन घ्यावे. तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असल्याने तात्काळ उपचारासाठी त्या भागातच कोविड केअर सेंटर उभारावेत. ज्या भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणत आहे त्या भागात तात्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करा अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.

जिल्हा सनियंत्रण समितीचे नियंत्रण

रुग्णालयामधील सुरक्षततेच्या दृष्टीने आवश्यक ते व्यवस्थापन करावे. रुग्णालयामध्ये इलेक्ट्रीक पुरवठ्याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी. ऑक्सिजन टाक्या ठेवण्यात आलेल्या ठिकाणी कोणताही ज्वालागृही पदार्थ ठेवू नये, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्हा सनियंत्रण समितीचे नियंत्रण आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी उपलब्ध बेड संख्या, ऑक्सिजन बेड, दाखल रुग्ण तसेच मृत रुग्णांची संख्या दररोज सुविधा पोर्टलवर भरणे आवश्यक असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी सांगितले.

कोरोनाबाधित रुग्णांच्या सोबत नातेवाईकांना येण्यास सक्त मनाई

रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसोबत अनेक नातेवाईक देखील येताना दिसतात. त्यांच्यावर बंधन आणणे आवश्यक आहे. बाधित रुग्णांसोबत आलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून कोरोना संसर्ग वाढतो व त्याच्यामार्फत इतरही लोक बाधित होतात. यावर निर्बंध आणण्यासाठी सर्व कोविड रुग्णालयाच्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांना येण्यास सक्त मनाई करावी. यासाठी रुग्णालयांनी खासगी सुरक्षा रक्षकांच्या नेमणुका कराव्यात अशा सूचना प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details