पंढरपूर- शहरामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, शहरातील सर्व व्यापाऱ्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करुन घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. या निर्देशानुसार व्यापाऱ्यांच्या रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.
पंढरपूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बैठकीला उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर यांच्यासह शहरातील व्यापारी उपस्थित होते. पंढरपुरात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू लागला आहे. नगरपालिकेने अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्व व्यापारी आणि दुकानदारांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे.