सोलापूर - बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलीच्या सलाईनमध्ये झुरळ आढळून आले आहे, असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, हे सर्व आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावले आहेत. तर नातेवाईकांनी रुग्णालय व सलाईन कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रुग्णालयासह संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी -
बार्शीतील एका रुग्णाच्या सलायनमध्ये झुरळ आढळल्याचे आरोप रुग्णाच्या नातेवाईकतर्फे करण्यात आले होते. प्रसाद सहस्त्रबुद्धे यांच्या भाचीवर रुग्णालायत उपचार सुरू असताना सलाईन देण्यात आली. यावेळी ती सलाईन मध्ये-मध्ये बंद होत होती, यावेळी सलाईन पाहण्याासाठी गेले असता त्यामध्ये झुरळ असल्याने आढळून आले, असे रुग्णाचे नातेवाईक प्रसाद सहस्त्रबुद्धे यांचे म्हणणे आहे. सलाईनमध्ये झुरळ आढळले असा आरोप त्यांनी जगदाळे मामा रुग्णालय प्रशासनावर करत संताप व्यक्त केला आहे. यावर चौकशी होऊन संबंधित सलाईन कंपनीवर आणि रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.