महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 1, 2020, 9:07 AM IST

ETV Bharat / state

कोरोना संकट, राज्यातील सहकारी संस्था निवडणुका लांबणीवर

सोलापूर जिल्ह्यातील 189 सहकारी संस्थांच्या निवडणूका डिसेंबर 2019 अखेरपर्यंत प्रलंबित होत्या. 2020 मध्ये जिल्ह्यातील 1 हजार 617 सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाचा कालावधी पूर्ण होत आहे. निवडणूका प्रलंबित असलेल्या व 2020 मध्ये निवडणूकीस पात्र असलेल्या अशा एकूण सहकारी संस्थांची संख्या ही 1 हजार 806 आहे.

कोरोना संकट, राज्यातील सहकारी संस्था निवडणुका लांबणीवर
कोरोना संकट, राज्यातील सहकारी संस्था निवडणुका लांबणीवर

पंढरपूर- राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, माळशिरस तालुक्‍यातील पांडुरंग सहकारी साखर कारखाना व शिवामृत सहकारी दूध संघ तर सोलापूर जिल्ह्यातील अ, ब, क व ड वर्गातील 1 हजार 806 सहकारी संस्थांच्या निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत.

जिल्ह्यातील 189 सहकारी संस्थांच्या निवडणूका डिसेंबर 2019 अखेरपर्यंत प्रलंबित होत्या. 2020 मध्ये जिल्ह्यातील 1 हजार 617 सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाचा कालावधी पूर्ण होत आहे. निवडणूका प्रलंबित असलेल्या व 2020 मध्ये निवडणूकीस पात्र असलेल्या अशा एकूण सहकारी संस्थांची संख्या ही 1 हजार 806 आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अनेक नामवंत व सहकारी संस्थांचा समावेश आहे. सध्या सहकारात नसलेल्या आणि मल्टिस्टेट झालेल्या सिध्देश्‍वर साखर कारखाना व सोलापूर जनता सहकारी बॅंकेचाही यामध्ये समावेश आहे.

या शिवाय सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचीही निवडणूक आता लांबणीवर पडली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्याचे मोठे आव्हान सहकार विभाग व सहकारी निवडणूक प्राधिकरणासमोर असणार आहे.

निवडणूकीला पात्र असलेल्या संस्था

अ वर्ग : 3

ब वर्ग : 831

क वर्ग : 495

ड वर्ग : 288

डिसेंबर 2019 पर्यंत निवडणूक प्रलंबित असलेल्या संस्था

अ वर्ग : 0

ब वर्ग : 11

क वर्ग : 160

ड वर्ग : 189

ABOUT THE AUTHOR

...view details