सोलापूर - पवारांची टीम आता संपली असून राज्यात फक्त आमचीच टीम काम करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पंढरपूर येथील सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवारांवरही जोरदार टीका केली. तसेच राज्यात दबाव टाकणाऱ्यांचे दिवस संपले आहेत. जर कोणी दबाव टाकत असेल तर दबाव टाकणाऱ्यांची रातोरात परिस्थिती बदलून टाकेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
पवारांची टीम संपली, राज्यात आता आमचीच टीम - मुख्यमंत्री - loksabha2019
जर कोणी दबाव टाकत असेल तर दबाव टाकणाऱ्यांची रातोरात परिस्थिती बदलून टाकेल.
काँग्रेसचे पंढरपूर तालुक्यातील नेते कल्याण काळे यांनी काँग्रेसला रामराम करून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. काळे यांच्या प्रवेशासोबतच माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात प्रचार सभा घेतली.
दबाव टाकणाऱ्यांची रातोरात परिस्थिती बदलून टाकीन - मुख्यमंत्री
काँग्रेसचे पंढरपुरातील नेते कल्याण काळे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करत असताना प्रवेश करू नये, यासाठी कल्याण काळे यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. याविषयावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रातील दबाव टाकणाऱ्यांचे दिवस आता गेले आहेत. काळे, तुमच्यावर जर कोणी दबाव टाकला तर दबाव टाकणाऱ्याची परिस्थिती रातोरात बदलून टाकीन, असे सांगत आपण तुमच्या कायम पाठिशी असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी काळे यांना दिले.