महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CM Eknath Shinde Wife: मुख्यमंत्री शिंदे यांच्या सौभाग्यवती लता यांचा साधेपणा; अन्नछत्रात भक्तांची केली सेवा - lata Shinde Serves Food

मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून, काही सदस्यांसोबत अक्क्लकोटमधील श्री स्वामी समर्थांच्या पादुका तसेच समाधीस्थळाचे दर्शन घेतल्या. यावेळी त्यांनी स्वामींच्या भक्तांना अन्नदान करत भक्तांची सेवा केली.

Solapur News
अक्कलकोटच्या अन्नछत्रात एकनाथ शिंदे यांच्या पत्नी

By

Published : Jul 11, 2023, 6:36 PM IST

सोलापूर: मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पादुका तसेच समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यानंतर प्रथेप्रमाणे त्यांनी अन्नछत्राला भेट दिली. मात्र यावेळी त्यांनी सर्वसामान्य सेवेकरी बनून स्वामी भक्तांना अन्नदान करण्याची इच्छा व्यक्त केली.

भक्तांची केली सेवा: लता शिंदे यांनी स्वतः हातात भाजी आणि भाताचे भांडे घेऊन त्यांनी सर्वसामान्य भक्तांना आग्रहपूर्वक प्रसाद वाढला. तसेच त्यांना वाढून झाल्यानंतरच स्वतः सर्वसामान्य भक्तासोबत बसून प्रसाद ग्रहण केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता यांचा साधेपणा पाहून स्वामी भक्त व उपस्थित नागरिक आश्चर्यचकित झाले.

लता शिंदे यांचा साधेपणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य माणसात मिसळून कायमच आपण त्यांच्यातील एक असल्याचे दाखवून देतात. पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यादेखील त्याला अपवाद नाहीत, याचा प्रत्यय अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळात पाहायला मिळाला. मुख्यमंत्री यांच्या पत्नी लता यांचा साधेपणा पाहून उपस्थित भक्तगण देखील मनोमन सुखावले आहेत.

साधेपणाने केला प्रसाद ग्रहण : व्हीआयपी, आमदार, खासदार स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले की, त्यांचे दर्शन होईपर्यंत सर्वसामान्य भक्तांना ताटकळावे लागते. इथे मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नीने आपला मिसेस मुख्यमंत्रीपदाचा बडेजाव बाजूला ठेवून, सर्वसामान्य भक्तांप्रमाणे प्रसाद वाढला तसेच भक्तांसोबत बसूनच प्रसाद घेतला.

राज्यात कही खुशी कही गम: राष्ट्रवादीत मोठी फूट पडून अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. याच पार्श्वमूमीवर राज्यात एकीकडे समाधान तर दुसरीकडे चिंतेची छाया असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नीने अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीस्थळी तसेच अन्नछत्राला भेट देत भक्तांची सेवा केली आहे.

हेही वाचा -

  1. Jay Jay Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ' मधील अक्षय मुडावदकर यांचे अक्कलकोट स्वामींचे दर्शन
  2. Sri Swami Samarth Math : दादरमधील भूतबंगला पावन झाला स्वामींच्या पादुकांनी, स्वामी समर्थांच्या मठात वाढतेय भाविकांची गर्दी
  3. Maharashtra Political Crisis: शिवसेना नाव व धनुष्यबाण कोणाचे? ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 31 जुलैला होणार सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details