सोलापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्त शासकीय महापूजेसाठी देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असले तरी येणाऱ्या विधानासभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते गाठीभेटी घेणार आहेत.
मुख्यमंत्री दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर, शुक्रवारी पहाटे करणार विठ्ठलाची महापूजा - pandharpur
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आणि उद्या २ दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्त शासकीय महापूजेसाठी देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असले तरी येणाऱ्या विधानासभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते गाठीभेटी घेणार आहेत.
आज (दि. 11 जूलै) मुख्यमंत्री विमानाने सोलापूर विमानतळावर येणार आहेत. मुख्यमंत्री दुपारी सोलापूर शहरात आल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री सोलापुरातून पंढरपूरला जाणार आहेत.
आज सायंकाळी पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता दिंडीचा समारोप होणार आहे. त्यानंतर विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके, कल्याणराव काळे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री भेट देणार आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील या गाठीभेटी खूप महत्वाच्या ठरणार आहेत.