महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृष्णा भीमा स्थिरीकरण होणारच; मोदी है तो मुमकीन है, मुख्यमंत्र्यांचा जयंत पाटलांना टोला

कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना पूर्ण करणार असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांना टोला लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Sep 1, 2019, 9:04 PM IST

सोलापूर - जयंत पाटील म्हणतात, की भिमा स्थिरीकरण योजना कशी होणार. मात्र, मोदी है तो मुमकीन है. त्यामुळे कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना पूर्ण करणार असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांना टोला लगावला.

विरोधकांच्या यात्रेत मंगल कार्यालयही भरत नाही

महाजनादेश यात्रा ही जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी काढली आहे. आम्ही सत्तेत असलो की संवादाची यात्रा काढतो आणि विरोधी पक्षात असलो की संघर्षाची यात्रा काढतो. आमच्या यात्रेला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या यात्रेला मंगल कार्यालही भरत नसल्याचा टोला मुख्यमंत्री देवंद्र फडवीस यांनी विरोधकांना लगावला.


त्यावेळेस ईव्हीएम चांगले कसे
२००४ ते २०१४ या काळात प्रत्येक निवडणूक ईव्हीएम झाली. त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आवाद उठवला नाही. तेव्हा ईव्हीएममध्ये घोटाळा नव्हता. आता आमची सत्ता आली की कसा ईव्हीएममध्ये घोटाळा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडून आल्या की ईव्हीएम चांगले आणि सोलापूरमधून जयसिद्धेश्वर निवडून आले की ईव्हीएम वाईट कसे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

५ वर्षात शेतकऱ्यांना ५० हजार कोटी
भाजपचे सरकार हे सर्व समाजाच्या पाठीशी उभे आहे. ५ वर्षात ५० हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दिले. येणाऱ्या काळात पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग पुसून टाकणार असल्याचे मुख्यमंत्री मंहणाले. १५ वर्षाच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे डझन डझन मंत्री पश्चिम महाराष्ट्रातले होते. मात्र, त्यांनी एकही प्रकल्प पूर्ण केला नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details