महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आजी-माजी महिला पोलीस अधिकाऱ्यांचा राडा; निवृत्त निरीक्षक महिलेने घेतला चावा - महिला पोलीस जखमी

पंढरपूर शहरात एका सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक महिलेने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजी-माजी महिला पोलीस अधिकाऱ्यांचा राडा
आजी-माजी महिला पोलीस अधिकाऱ्यांचा राडा

By

Published : Oct 25, 2020, 8:40 AM IST

पंढरपूर(सोलापूर)- शहरात एका निवृत्त पोलीस निरीक्षक महिलेने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांशी हुज्जत घालून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्यात गाडी अडवल्याने चिडलेल्या निवृत्त पोलीस निरीक्षक महिलेने वाहतूक नियमनाचे काम करणाऱ्या एका महिला पोलिसाला जखमी केले आणि दुसऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या गणवेशावर असलेली नेमप्लेट तोडून दाताने चावा घेतला. ही घटना येथील पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळ घडली. या प्रकरणी सेवानिवृत्त पोलिस इन्स्पेक्‍टरसह गाडी चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सेवानिवृत्त महिला पोलीस इन्सपेक्टर वंदना उत्तम शिरगिरे (रा.इसबावी) असे चावा घेतलेल्या महिलेचे नाव आहे. तर सोनाली इंगोले आणि पोलीस उपनिरीक्षक महाडिक असे या जखमी झालेल्या महिला पोलिसांची नावे आहेत.

शनिवारी कोर्टी रस्त्याच्या बाजूने सेवा निवृत्त महिला पोलीस अधिकारी असलेल्या शिरगिरे यांची कार येत होती. त्यावेळी रेल्वेपूलाच्या दिशेनेही कार जात असताना कर्तव्यावर असलेल्या तक्रारदार महिला कर्मचारी सोनाली इंगोले यांनी रस्त्याचे काम सुरू असल्याने तुम्हाला तेथून जाता येणार नाही, असं समजावून सांगितले. परंतु तरीही सदर सेवानिवृत्त वंदना शिरगिरे आणि कारमधील चालक यांनी सोनाली इंगोले यांच्याशी हुज्जत घातली. रस्त्यावर कार आडवी लावून वाहतूक कोंडी केली. समजावून सांगूनही आरोपींनी आरडाओरड करुन मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.

हा सर्व प्रकार सुरू असताना कर्तव्यावर असलेल्या सोनाली इंगोले यांनी तरीही गाडी पुढे नेण्यास मज्जाव केला. त्यानंतर आरोपींनी साक्षीदार महिला पोलीस उपनिरीक्षक महाडिक यांच्या गणवेशावर असलेली नेमप्लेट तोडून त्यांच्या बोटाचा चावा घेतला आणि तक्रारदार सोनाली इंगोले यांना नखाने ओरखडे काढून जखमी केले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सोनाली इंगोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details