महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माढ्यामध्ये निवडणुकीला गालबोट, दोन गटात हाणामारी - माढा विधानसभा इलेक्शन न्यूज 2019

अपक्ष उमेदवार नारायण पाटील आणि संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाल्याची माहिती आहे. या प्रकारानंतर मतदान केंद्रावर नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी काही काळ मतदान प्रकिया थांबविली होती. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली.

माढ्यामध्ये दोन गटात हाणामारी

By

Published : Oct 21, 2019, 12:07 PM IST

Updated : Oct 21, 2019, 1:43 PM IST

सोलापूर- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघात आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, माढा तालुक्यातील दहिवली गावात 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. अपक्ष उमेदवार नारायण पाटील आणि संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाल्याची माहिती आहे. करमाळ्यातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाल्याचा आरोप नारायण पाटील यांनी केला आहे. या प्रकारानंतर मतदान केंद्रावर नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी काही काळ मतदान प्रकिया थांबविली होती. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली.

माढ्यामध्ये दोन गटात हाणामारी

संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची दडपशाही सुरू असल्याचा आरोप करत नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रकिया थांबविली होती. मात्र, प्रशासनाने योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे मतदान प्रक्रिया सुरू झाली.

दहिवली हे गाव माढा तालुक्यात असले तरी ते करमाळा विधानसभा मतदारसंघात येते. शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांना शिवसेना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तसेच संजय शिंदे हे देखील अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

Last Updated : Oct 21, 2019, 1:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details