महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर : विमानतळासाठी अडथळा ठरणारी साखर कारखान्याची चिमणी पडणार; 1 कोटी 20 लाखांची निविदा मंजूर - sugar factory chimney solapur

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने 2012 साली बगॅसचा प्रोजेक्ट कामकाज सुरू केला होता. 2014 साली हा प्रोजेक्ट पूर्ण झाला. याचवर्षी केंद्र सरकारने सोलापूर शहराला स्मार्टसिटीचा दर्जा दिला. त्याअनुषंगाने सोलापुरात स्मार्ट सिटीचे कामकाजदेखील सुरू झाले. सोलापूर शहराला डेली विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी अनेक समाजसेवकांनी प्रयत्न केला आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

chimney of the sugar factory will be demolished solapur over airport service
साखर कारखान्याची चिमणी पडणार

By

Published : Jul 11, 2021, 1:05 AM IST

सोलापूर - येथे नियमित विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचा निर्णय सोलापूर महानगरपालकेत सर्वानुमते झाला. सोलापूर महानगरपालिकेत ऑनलाइन झालेल्या सभेत चिमणी प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधी आमने सामने झाले होते. काँग्रेसमधील नगरसेवकांनी चिमणी पाडू नका, अशी भूमिका घेतली. तर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी सोलापूरला विमानसेवा नसल्याने विकास थांबला आहे, अशी भूमिका घेतली. तर दररोजची विमानसेवा नसल्याने सोलापूरचा विकास थांबला आहे. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने शासनाची कोणतीही परवानगी न घेता कारखान्यात को जनरेशन प्लांट उभा केला आहे, असे याचिकाकर्ते डॉ. संदीप आडके यांनी सांगितले.

याचिकाकर्ते डॉ. संदीप आडके याबाबत बोलताना

तीन वेळा निविदा मंजूर -

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने 2012 साली बगॅसचा प्रोजेक्ट कामकाज सुरू केला होता. 2014 साली हा प्रोजेक्ट पूर्ण झाला. याचवर्षी केंद्र सरकारने सोलापूर शहराला स्मार्टसिटीचा दर्जा दिला. त्याअनुषंगाने सोलापुरात स्मार्ट सिटीचे कामकाजदेखील सुरू झाले. सोलापूर शहराला डेली विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी अनेक समाजसेवकांनी प्रयत्न केला आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयानेही यापूर्वीच चिमणी पाडा, असा निकाल दिला होता. चिमणी पाडण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी दोन वेळा चिमणी पाडण्यासाठी निविदा काढल्या होत्या. मात्र, आजतागायत ही चिमणी पाडली गेली नाही.

हेही वाचा -अल्पवयीन मुलीशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या कंडक्टरला एका वर्षाची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड

औद्योगिक विकास थांबला -

दरम्यान, सोलापूर शहराला दररोज विमानसेवा नसल्याने परदेशातील ग्राहक सोलापूरकडे येत नाहीत. यामुळे सोलापूर शहराचा आणि जिल्ह्यातील औद्योगिक विकास थांबला असल्याची खंत अनेक उद्योजकांनी व्यक्त केली. तसेच ज्या शहरात दळणवळणाची योग्य व्यवस्था असते त्याच ठिकाणी ग्राहकांची रेलचेल असते, असे मत उद्योजक व्यक्त करत आहेत.

चिमणी पाडल्यास शेतकऱ्यांचे नुकसान नाही - महापौर

श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा नुकसान होणार नाही, अशी माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सांगितले आहे. तसेच चिमणी पाडल्यानंतर उसाचे गाळपही थांबणार नाही. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने को जनरेशन (ब गॅस) प्रोजेक्ट उभा करताना सोलापूर महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही, अशी माहितीही महापौर श्रीकांचना यनम यांनी दिली आहे.

1 कोटी 20 लाखांच्या निविदेला मंजुरी -

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कुमठे येथील सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी 1 कोटी 20 लाख रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली आहे. आणि ही रक्कम साखर कारखान्याकडून वसूल करण्यात येणार आहे, अशी माहिती याचिकाकर्ते डॉ. संदीप आडके यांनी दिली.

हेही वाचा -धक्कादायक: मोबाईलसाठी नातवाने केली आजीची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details