महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

के.के. एक्सप्रेसच्या धडकेने शालेय विद्यार्थी मृत्युमुखी - रेल्वे पोलीस

करमाळा तालुक्यातील केत्तुर येथील शाळेत शिकणारा मुलगा के.के. एक्सप्रेसच्या धडकेत ठार झाला आहे.

मृत तानाजी पवार

By

Published : Nov 19, 2019, 3:42 PM IST

सोलापूर- करमाळा तालुक्यातील केत्तुर नंबर दोन येथील नेताजी सुभाष विद्यालयात दहावीत शिकणारा विद्यार्थी सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेची धडक बसून ठार झाला. ही घटना पारेवाडी-जिंती दरम्यान घडली. तानाजी दत्तात्रय पवार (वय 16 वर्षे), त्या मुलाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, रविवारी शाळेला सुट्टी असल्याने तानाजी आपल्या मूळगावी गुलमोहरवाडी येथे गेला होता. सोमवार (दि. १८ नोव्हें.) रोजी तो गावाकडून शाळेसाठी केतूरला जात असताना असताना 9.45 वाजेदरम्यान रेल्वे मार्गाच्या बाजूने जात असताना समोरून येणाऱ्या बेंगलोर-नवी दिल्ली (गाडी क्र.12627) के.के. सुपरफास्ट एक्सप्रेसने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत तो जागीच ठार झाला. याबाबत पारेवाडी रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलीस अनिल पाटील यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना व करमाळा ग्रामीण पोलिसांनाही कळविली. तानाजी यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details