सोलापूर - मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील शेत तळ्यात बुडून एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना २ नोव्हेंबर रोजी दुपारी १.१५ च्या सुमारास घडली होती. दामाजी उर्फ पवन नामदेव अवघडे (वय १६ रा. साठेनगर, मंगळवेढा) असे मृत मुलाचे नाव आहे.
मंगळवेढा तालुक्यात शेततळ्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू - Damaji Awghade death magalvedha
दामाजी त्याचा मामा अशोक भगवान कांबळे यांच्या शेततळ्यातील पाण्यात बुडाला व त्याचा मृत्यू झाला. दामाजीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत बसवंत कांबळे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात माहिती दिली असून अधिक तपास पोलीस कर्मचारी तुकाराम कोळी करीत आहे.
दामाजी उर्फ पवन नामदेव अवघडे
दामाजी त्याचा मामा अशोक भगवान कांबळे यांच्या शेत तळ्यातील पाण्यात बुडाला व त्याचा मृत्यू झाला. दामाजीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत बसवंत कांबळे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात माहिती दिली असून अधिक तपास पोलीस कर्मचारी तुकाराम कोळी करीत आहे.
हेही वाचा-पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 1 डिसेंबरला मतदान