पंढरपूर - बनावट कोरोना तपासणी अहवाल तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सील करण्यात आली आहे. या प्रकरणात आकाश गोरख आदमिले, उमेश शिंगटे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यापासून बनावट अहवाल तयार करण्याचा काळा बाजार सुरु होता.
आरोग्य विभाग व पोलीसांची संयुक्त कारवाई
कोविड तालुका कृति समितीकडून शहरातील अनधिकृत कोविड टेस्टिंग करुन बनावट रिपोर्ट लॅबद्वारे दिल्या जात आहे. अशी माहिती मिळताच पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. गिराम, तालुका आरोग्यअधिकारी डॉ. एकनाथ बोधले, नायब तहसीलदार कोळी, पोलिस उपनिरीक्षक मगदूम यांच्या पथकाने अचानक लॅबवर छापा टाकला. यावेळी वात्सल्य लॅबचे चालक आदमिले यास अवैधरित्या बनावट रिपोर्ट तयार करताना व रॅपिड अँटिजेंन टेस्ट किट सहित रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याला किट पूरवणारा तसेच बनावट अहवाल तयार करुन देणारा उमेश शिंगटे यालाही पकडले आहे. आदमिले व उमेश शिंगटे आम्ही दोघे हे काम गेल्या 3 महिन्यापासुन करत असल्याची कबुली त्यांनी दिली. याबाबत शहर पोलिस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.