महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरचे नाव बदलून 'पुण्याश्लोक अहिल्यादेवी नगर' करा -गोपीचंद पडळकर - अहिल्यादेवी नगर

अहमदनगरचे नाव बदलून "पुण्याश्लोक अहिल्यादेवी नगर" करावे अशी मागणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ( Gopichand Padalkar ) अहिल्यादेवींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात झाल्याने त्यांचे नाव द्यावे,अशी भावना समस्त अहिल्याप्रेमींची असल्याची पडळकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेही मागणी केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर
आमदार गोपीचंद पडळकर

By

Published : Jul 27, 2022, 10:30 PM IST

सांगली - अहमदनगरचे नाव बदलून "पुण्याश्लोक अहिल्यादेवी नगर" करावे अशी मागणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ( Change the name of Ahmadnagar ) अहिल्यादेवींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात झाल्याने त्यांचे नाव द्यावे,अशी भावना समस्त अहिल्याप्रेमींची असल्याची पडळकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेही मागणी केली आहे.

अहमदनगरचे नाव बदलून पुण्याश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची मागणी

लोकहितासाठी कुशल प्रशासनाचा वास्तुपाठ - आमदार पडळकर यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे, हिंदू राजमाता अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण हिंदुस्तानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेंव्हा मुघल, निजामशाहीचे हिंदू सांस्कृतिक हल्ले होत होत. मंदिरे लुटली आणि तोडली जात होती. त्यावेळी अहिल्यादेवींनी हिंदू सांस्कृतिमध्ये प्राण फुंकले. त्यांचे जीर्णोद्धार केले. अनेक घाट, बारव बांधले मंदिराचा पुनर्निर्माण केले. स्त्रियांना सन्मान मिळवून दिला. लोकहितासाठी कुशल प्रशासनाचा वास्तुपाठ घालून दिला अस ते म्हणाले आहेत.

निजामशाहीचा इतिहास डोकावता कामा नये - आज जे काही या देशातील सांस्कृतिक वैभव टिकून आहे. त्यामध्ये हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मोठा वाटा आणि वारसा आहे. त्यांची कर्मभूमी अखंड हिंदुस्तान आहे. परंतु, त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची ओळख करून देताना निजामशाही इतिहास डोकावता कामा नये. तर, अहिल्यादेवी हिंदुस्थानाच्या प्रेरणास्थान हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची स्वातंत्र इतिहासाचे स्मरण झाले पाहिजे असही ते म्हणाले आहेत.

अहिल्यादेवी नगर नामांतरांचा निर्णय तातडीने घ्या - अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून "पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर" करण्यात यावे, अशी तमाम आहिल्या प्रेमींची लोकभावना आहे. असे झाल्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नावे असणारे हिंदुस्थानातला पहिला जिल्हा महाराष्ट्रात असेल, हे बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असणार आहे. त्यामुळे आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरांचा निर्णय तातडीने घ्यावा, ही विनंती. अशा आशयाच्या मजकुराचे पत्र पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.



हेही वाचा -Pravin Darekar : 'उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा, चटक ठेवली नसती तर...'; प्रवीण दरेकरांनी साधला निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details