सोलापूर - सध्या भाजपला सत्ता आणि खुर्ची लकी नसल्याचे चित्र दिसत आहे. कारण कालच (मंगळवार) लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निकालात भाजपला पराभवचा धक्का बसला आहे. दिल्लीत आलेल्या अपयशावरुन विरोधक भाजपवर टीका करत आहेत. टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खुर्ची लडखडली, आणि ते पडता-पडता वाचले.
चंद्रकांत पाटलांना खुर्चीचा दगा चंद्रकांत पाटील हे सध्या सोलापूरच्या खासगी दौऱ्यावर आहेत. ऐनवेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत शिवसेनेची हिंमत काढली. पुढे हे सरकार लवकरच पडेल, असे म्हणता म्हणता ...दिल्ली अन् देवेंद्र फडणवीस विषयावर बोलताना अचानक त्यांची खुर्ची लडखडली, आणि ते पडता-पडता वाचले.
हेही वाचा - खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा
हेही वाचा - याचिकाकर्त्याने सबळ पुरावे न दिल्याने गडकरींना न्यायालयाचा मोठा दिलासा
हेही वाचा -'तिने' कॅन्सरग्रस्तासाठी केले केस दान; म्हणते सर्व मुली करू शकतात कॅन्सरग्रस्तांसाठी केस दान
दिल्लीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशानंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आनंद व्यक्त केला. यावर बोलताना पाटील म्हणाले की, हे म्हणजे शेजारच्या घरात मुलगा झाला म्हणून पेढे वाटण्यासारखं आहे. शिवसेनेने सामनातून आमच्यावर टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर राज्यात स्वतंत्र निवडणुका लढवून दाखवाव्या असा टोला त्यांनी सेनेला लगावला. हे बोलताना अचानक चंद्रकांत पाटलांची खुर्ची अचानक लडखडली अन ते पडता...पडता वाचले. पुढे आमदार सुभाष देशमुख आणि भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना सावरले. मग पुन्हा पाटील पुन्हा बोलू लागले मात्र, त्यांची देहबोली पूर्वीसारखी तितकीशी साधारण नव्हती. त्यामुळं त्यांनी केलेल्या भीमगर्जनांपेक्षा प्रसारमाध्यमात किस्सा कुर्सी का अशीच चर्चा सुरू होती.