सोलापूर- सोलापूर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शहर वासीयांना 1 सप्टेंबरपासून दर महिन्याला 50 रुपये याप्रमाणे वार्षिक उपकर द्यावाच लागेल, असे राज्य शासनाचे आदेश असल्याची माहिती सोलापूर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी माध्यमांना दिली.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वी शहरवासीयांना ओला कचरा व सुका कचरा यासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले होते. तसेच कचरा व्यवस्थापन करण्यासाठी नागरिकांच्या घरोघरी घंटा गाड्या देखील जात आहेत. याच्या व्यवस्थपनासाठी हे उपकर लावला जात असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
या उपकर विरोधात माकप व सिटूच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. टाळेबंदीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. शासनाने हे उपकर लादून शहर वासीयांची लूट करू नये व तसेच कचरा व्यवस्थापनासाठी महापालिका प्रशासन कर घेत आहे. तरी देखील 1 सप्टेंबर, 2020 पासून अतिरिक्त 50 रुपये कर भरावा या आदेशाला अनेक सामाजिक संघटना विरोध करत आहेत.