याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळ पासून मंदिरात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना मास्क सक्तीचा केला (Caution from Vitthal Rukmini Temple Committee) आहे, मात्र भाविकांना अद्याप मास्कची सक्ती करण्यात आली नाही. भाविकांना मास्कची सक्ती करण्यात आली नसली तरीही, भाविकांनी मात्र मास्कचा वापर करावा (distribution of masks to devotees) असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे. त्यासाठी खबरदारी म्हणून मंदिराच्या प्रवेशद्वारावर भाविकांना मास्कचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे.
Caution from Vitthal Rukmini Temple : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून खबरदारी, भाविकांना मास्कचे वाटप
कोरोना वाढीच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमधून येत (background of increasing Corona) असताना शिर्डी येथील साई मंदिर देवस्थाने भाविकांना मंदिर मध्ये प्रवेश करत असताना मास्क सक्तीचा केला आहे. तर, दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनेही त्या संदर्भात दक्षता घेण्यास (Caution from Vitthal Rukmini Temple Committee) सुरुवात केली आहे. याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी अधिकची माहिती दिली (distribution of masks to devotees) आहे.
गेल्या सुमारे वर्षभरात जगाच्या कानाकोपऱ्यात करोना लाटा निर्माण करणारा विषाणू हा प्रामुख्याने ओमायक्रॉनचाच उपप्रकार असल्याचे दिसून येत आहे. डेल्टा या करोनाच्या उत्परिवर्तित प्रकारानंतर सर्वाधिक वेगवान संक्रमण करणारा प्रकार म्हणून ओमायक्रॉन हा प्रकार पुढे आला. डेल्टाक्रॉनसारखे इतरही काही प्रकार आले, मात्र ते तुलनेने क्षीण आणि तात्पुरते ठरले. ओमायक्रॉन आणि त्याचे उपप्रकार मात्र तग धरून ठेवण्यात यशस्वी झाले. चीनमध्ये सध्या दिसणाऱ्या रुग्णवाढीस कारणीभूत ठरणारा प्रकारही ओमायक्रॉनचा उपप्रकार असून ‘बीएफ.७’ असे त्याचे जनुकीय नामकरण करण्यात आले आहे. तरी सुध्दा भयावह परिस्थिती उद्भवु नये, यासाठी महाराष्ट्रात सार्वजनिक स्थळी काही नियम व अटी लागू करण्यात (background of increasing Corona) आल्या आहेत.