सोलापूर -करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथील शहाजी दगडू माने यांच्या चार एकर शेतातील एरंडाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई लवकर मिळावी, अशी मागणी माने यांनी केली आहे.
करमाळ्यातील एरंडा पिकाचे नुकसान; शेतकऱ्याला लाखोंचा तोटा हेही वाचा - कर्तारपूर कॉरिडॉर: गुरुनानक जयंती निमित्त ५०० हून अधिक भाविक पवित्र स्थळी होणार रवाना
शेतकरी म्हणाले, दुष्काळावर मात करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने शेती करावी म्हणून मित्रांच्या मदतीने चार एकरामध्ये एरंडाचे पीक घेतले होते. यामध्ये साधारण पाच हजार रोपे आली होती. पावसामुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले असून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ते करत आहेत.
आतापर्यंत दीड ते पावणेदोन लाख रुपये खर्च झाला असून मला यापासून 15 ते 18 लाखापर्यंत उत्पन्न निघाले असते. परंतु, परतीच्या पावसाने मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहे. पिकांचे पंचनामे झाले आहेत. परंतु, नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी प्रतिक्रिया शहाजी माने या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
हेही वाचा - शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार केला नाही - काँग्रेस