महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार - pandharpur latest news

अकरावीत शिकत असताना तिची ओळख वर्गातील करण इंगोले याच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर करण इंगोले याने लग्नाचे आमिष दाखवत पंढरपूर तालुक्यातील भाळवणी व माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे विविध लॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार व वेळोवेळी अत्याचार केला.

पंढरपूर
पंढरपूर

By

Published : Apr 20, 2021, 4:35 PM IST

पंढरपूर -सांगोला तालुक्यातील एका गावांमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी करण अभिमान इंगोले याच्याविरोधात 376 कलमा नुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने सांगोला पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

वर्ग मित्रानेच केला बलात्कार -

पीडित मुलगी ही मामाकडे शिकण्यासाठी गेली होती. अकरावीत शिकत असताना तिची ओळख वर्गातील करण इंगोले याच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर करण इंगोले याने लग्नाचे आमिष दाखवत पंढरपूर तालुक्यातील भाळवणी व माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे विविध लॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार व वेळोवेळी अत्याचार केला. ही घटना ऑगस्ट 2020 ते 15 एप्रिल 2021 या कालावधीमध्ये घडल्याचे सांगण्यात आले.

सांगोला पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल -

वर्गमित्र असणाऱ्या करण इंगोले यांनी विविध ठिकाणी घेऊन जात बलात्कार केल्याची फिर्याद पीडित अल्पवयीन मुलींनी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये दिले आहे. पीडित मुलीच्या आईने सरकारी रुग्णालयात तपासणी केली असता. त्यावेळेस अल्पवयीन मुलगीही चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. करण इंगोले यांच्या विरोधात 376 कलमानुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details