सोलापूर - पंढरपूरच्या श्री विठ्ठल एज्युकेशन अॅँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या नावाने कोरोनाची अफवा पसरवणे आणि महाविद्यालयाची बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुध्द गुन्हा दाखल करण्याता आला आहे. पंढरपुरातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अशा प्रकारचा दाखल झालेला जिल्ह्यातील हा पहिला गुन्हा आहे.
कोरोनासंदर्भात अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल - corona update solapur
पंढरपूरच्या श्री विठ्ठल एज्युकेशन अॅँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या नावाने कोरोनाची अफवा पसरवणे आणि महाविद्यालयाची बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुध्द गुन्हा दाखल करण्याता आला आहे.दरम्यान, पंढरपूर तालुका पोलिसांनी महाविद्यालयाच्या बदनामीची खोटी न्यूज व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला असून अशा प्रकारच्या व्हायरल अफवा पोलिसांठी डोकेदुखी ठरत आहे.
पंढरपुरात विविध व्हॉटसअॅप ग्रुपवरुन ' महाराष्ट्रात आणखी एक आढळला कोरोना रुग्ण’ स्वेरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता विद्यार्थी; संस्थेने फेटाळला सुट्टीचा अर्ज’ अशा आशयाचा मजकूर एका वृत्तवाहिनीच्या लोगोचा वापर करुन खोटी बातमी तयार करून अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल केली. महाविद्यालयाच्या नावाची ही व्हायरल बातमी स्वेरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकाने पाहिली. त्यानंतर त्याच्या पालकाने महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना फोन करुन संबंधीत बातमीबाबत चौकशी केली. परंतु असा कोणताही प्रकार घडला नसून घाबरु नका, असे सांगितले. दरम्यान, श्री विठ्ठल एज्युकेशन अॅँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरी कॉलेजचे प्राध्यापक मुकुंद मारुती पवार यांनी शनिवारी अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल केला. मात्र, या बातमीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पंढरपूर तालुका पोलिसांनी महाविद्यालयाच्या बदनामीची खोटी न्यूज व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला असून अशा प्रकारच्या व्हायरल अफवा पोलिसांठी डोकेदुखी ठरत आहे.