सोलापूर- कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांवर फूलांची उधळण करणे एमआयएमच्या नेत्याला चांगलेच भोवले आहे. संचारबंदीचा आदेश लागू असताना पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव घेऊन शासकीय रुग्णालयात जमा झाल्यामुळे फारूक शाब्दी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडत असताना सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवशी निरोप देण्यात आला. पालकमंत्री यांच्यासह सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे, वैद्यकीय अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. या सर्वांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवत, कोरोनामुक्तांना झालेल्यांना निरोप देण्यात आला.