सोलापूर : बनावट खत विक्रीप्रकरणी आणखी दोघांना अटक - सोलापूर गुन्हे बातमी
जय किसान म्युरेट ऑफ पोटॅश या खताची बोगस विक्री केल्याप्रकरणी आणखी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
करमाळा (सोलापूर) - जय किसान म्युरेट ऑफ पोटॅश या खताची बोगस विक्री केल्याप्रकरणी आणखी दोन जणांना पोलिसांनी शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. संशयितामध्ये फोंडशिरस (ता. माळशिरस) येथील येथील हनुमंत रामा धायगुडे व इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी येथील खत दुकानदार योगेश गोरख अवताडे यांच्यावर गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
करमाळा पोलिसांकडून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे, की बनावट जय किसान रेट ऑफ पोटॅश आपल्याकडे शिल्लक असल्यास त्याबाबत कळविण्याचे आवाहन, करमाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पाडोळे यांनी केले. या गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक पाडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एल. जाधव व पोलीस शिपाई जी. एस. चव्हाण हे करत आहे.