महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाळू माफियांविरुद्ध मोहीम : पंढरपूर तालुक्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल - पंढरपूर पोलीस बातमी

सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून वाळू तस्करीवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. भीमा नदी पात्रातून वाळू तस्करी होत असते. महसूल व पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जाते. त्याचप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून वाळू तस्कराविरुद्ध चांगलीच मोहीम उघडली आहे.

पंढरपूर
पंढरपूर

By

Published : Jul 11, 2021, 10:02 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून वाळू तस्करीवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. भीमा नदी पात्रातून वाळू तस्करी होत असते. महसूल व पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जाते. त्याचप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून वाळू तस्कराविरुद्ध चांगलीच मोहीम उघडली आहे. दोन ट्रॅक्टर सहा एक टेम्पो वाळूची तस्करी करताना पोलिसांनी पकडला आहे. यामध्ये 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर सात वाळू माफियांविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली आहे.

पंढरपूर तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया

पंढरपूर तालुक्यात भीमा नदीपात्रातून राजरोसपणे वाळूची तस्करी केली जात असते.. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाकडून कारवाई होते. तालुक्यातील सुस्ते येथे ट्रॅक्टरमधून अज्ञात चालक वाळू तस्करी करताना पोलीस पथकाला आढळला. ट्रॅक्टरचा डम्पिंग मध्ये अर्धा बास वाळू असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल झाला आहे तर तालुक्यातील पुळूज येथे रस्त्यावरून टेम्पो च्या माध्यमातून वाळूची तस्करी केली जात होती. त्यावेळी पोलीस पथकाकडून त्यावर कारवाई करण्यात आली. कारवाईत एक टेम्पो 1 ब्रास वाळू आढळून आली. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात जमीर रफिक मुलानी, ओमकार लक्ष्मण भोसले, शिवाजी सलगर, अनिल दिनकर, चव्हाण महादेव शेंडगे उर्फ पैलवान (सर्व रा. पुळूज, ता. पंढरपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तिसऱ्या कारवाईमध्ये शेगाव दुमदुमले येथे वाळू तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नदीपात्रात वाळूची चोरी करत असताना स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर आढळून आला ट्रॅक्टर्स 1 ब्रास वाळू पोलिसांनी पकडली आहे. या प्रकरणी रमेश मोहन साळुंखे (रा. शेगाव दुमला) याच्या विरोधात परवाना नसताना उत्खनन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भीमा नदीपात्रातून चोरीच्या पद्धतीने वाळूची उपसा करणाऱ्यांविरोधात पंढरपूर पोलीस प्रशासनाकडून धडक मोहीम सुरू केली आहे. पंढरपूर तालुका पोलिसांनी एका दिवसात तीन ठिकाणी कारवाई केल्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध अवैधरित्या वाळूचे उत्खनन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर दोन ट्रॅक्टर एक टेम्पो यांच्यासह 13 लाख रुपयांचा मुद्देमाल ही पोलिसांनी जागेवर जप्त केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर करत आहे.

हेही वाचा -सोलापूर जिल्ह्यात लाचखोरीत पोलीस खाते अव्वल, सात महिन्यात सहा पोलीस अटकेत

ABOUT THE AUTHOR

...view details