महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Indias Got Talent 10 : सोलापूरच्या आदित्यचे पत्ते फेकण्याचे अजब कौशल्य,  इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये चीनचा मोडला विश्वविक्रम - Card Throwing World Champion

एका पत्त्यांच्या जादूगाराने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नवा विश्वविक्रम केला आहे. एका तासात जास्तीत जास्त पत्ते कलिंगडात रुततील असे फेकून मारण्याचा (Card Throwing World Champion) विश्वविक्रम सोलापूरच्या आदित्य कोडमूर यांनी केला आहे. आदित्यने याआधीच (Aditya Kodmur) तीनवेळा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडले आहेत.

Solapur News
एका मिनिटात 18 पत्ते फेकून मारण्याचा विश्वविक्रम

By

Published : Aug 6, 2023, 7:21 PM IST

Updated : Aug 7, 2023, 7:32 AM IST

प्रतिक्रिया देताना आदित्य कोडमुर

सोलापूर : सोलापूरच्या आदित्य कोडमूर याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड चीनच्या व्यक्तीच्या नावावर होता. आदित्य कोडमूर या तरुणाने सर्वाधिक म्हणजे एका मिनिटात 18 कार्ड कलिंगडमध्ये रुततील असे मारून जागतिक विश्वविक्रम केला (Card Throwing World Champion) आहे. त्यामुळे आता कार्डच्या जादूगाराकडून सोलापूरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या खेळात आदित्यने या आधीच तीनवेळा (Aditya Kodmur) गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला होता. इंडिया गॉट टॅलेंटमध्ये विश्वविक्रम केला असून आता, अमेरिका गॉट टॅलेंट, एशिया गॉट टॅलेंटमध्ये विश्वविक्रम करणार आहे. आई-वडिलांच्या पाठिंब्याने हा जागतिक विश्वविक्रम केला असल्याचे आदित्यने सांगितले.

शो- इंडियाज गॉट टॅलेंट

एका मिनिटात 18 कार्ड कलिंगडमध्ये मारून विश्वविक्रम : 'एका मिनिटात 17 पत्ते कलिंगडात रुततील असे फेकून मारण्याचा' गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चीनच्या व्यक्तीवर होता. हा रेकॉर्ड आदित्य कोडनूर यांनी तोडला आहे. एका मिनिटात 18 पत्ते मारून आदित्यने जागतिक विश्वविक्रम करत चीनचा रेकोर्ड मोडीत काढला आहे. भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भविष्यात जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आदित्यने व्यक्त केला आहे. पत्त्यांसोबत काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात आदित्यने हे अनोखे कौशल्य प्रचंड सराव आणि निष्ठेने विकसित केले आहे.

चिकाटीच्या जोरावर नवा विश्वविक्रम केला

'एका मिनिटात 17 पत्ते कलिंगडात रुततील असे फेकून मारण्याचा' गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चीनच्या व्यक्तीवर होता. हा रेकॉर्ड आदित्य कोडनूर यांनी तोडला आहे. एका मिनिटात 18 पत्ते मारून आदित्यने जागतिक विश्वविक्रम करत चीनचा रेकोर्ड मोडीत काढला आहे. इंडिया गॉट टॅलेंटमध्ये विश्वविक्रम केला असून आता अमेरिका गॉट टॅलेंट, एशिया गॉट टॅलेंटमध्ये विश्वविक्रम करणार आहे - आदित्य कोडमूर

लहानपणापासून जादूगार होण्याची आवड : आदित्य कोडनूर याला लहानपणापासून जादूगरी करण्याची आवड होती. सुरुवातीला आईवडिलांनी विरोध केला. त्यानंतर त्यांची आवड पाहून आई-वडिलांनी पाठिंबा दिला. शिक्षणात कोणत्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. पदवीचा अभ्यासक्रम करत पत्ते खेळण्याचे जादूगरी सुरूच ठेवले. इंडिया गॉट टॅलेंट रेकोर्डमध्ये सहभागी होण्यासाठी तब्बल तीन वर्षे सराव केला. आयजीटीनंतर अमेरिका गॉट टॅलेंट, एशिया गॉट टॅलेंटमध्ये विश्वविक्रम करणार असल्याचा विश्वास आदित्यने व्यक्त केला आहे.

'रियालिटी शो'मधून आदित्यने रेकोर्ड केला : असामान्य प्रतिभेच्या प्रदर्शनाने भारत देश जगभरात आपला ठसा उमटवत आहे. देशातील वैविध्यपूर्ण प्रतिभेला नवीन संधी उपलब्ध करून देणारा असाच एक मंच म्हणजे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांचा लाडका रियालिटी शो- इंडियाज गॉट टॅलेंट. 'विजयी विश्व हुनर हमारा' हे या शोचे यंदाचे ब्रीद असून पहिल्या आठवड्यात स्पर्धकांनी सादर केलेल्या नेत्रदीपक अ‍ॅक्टसमुळे आणि त्यांच्या अनोख्या कौशल्याच्या प्रदर्शनामुळे प्रेक्षकांकडून या आंतरराष्ट्रीय फॉरमॅटचे खूप कौतुक होत आहे. या शोच्या यंदाच्या विशेष अशा 10 व्या सत्रात 'हुनर'वर प्रकाश झोत असेल आणि प्रत्येक अ‍ॅक्टसनंतर कार्यक्रमाचा दर्जा आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावत जातील. या आठवड्याच्या शेवटी प्रेक्षक इतिहास घडताना बघतील. कारण, स्पर्धेतील 6 स्पर्धक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. आदित्य कोडनूर याने सोनी टीव्हीच्या या रियालिटी शो मधून जागतिक विश्वविक्रम केला आहे.

हेही वाचा -

  1. Srishti Jagtap World Record: लातूरच्या 'सृष्टी'ने देशाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा, सलग १२७ तास नृत्याचा विश्वविक्रम
  2. Pranav Bhopale: कोल्हापूरातील फ्रीस्टाईल फुटबॉलर प्रणवचा आणखी एक जागतिक विक्रम !
  3. World Record: वर्ल्ड रेकॉर्ड सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळीतून साकारली साईंची प्रतिमा, पाहा खास व्हिडिओ
Last Updated : Aug 7, 2023, 7:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details