महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mohol Pandharpur Highway Accident : मोहोळ-पंढरपूर मार्गावर थांबलेल्या ट्रकला कारची धडक; पोलीस कर्मचांऱ्यांसह दोघांचा मृत्यू - Mohol Pandharpur Highway Accident

मोहोळहून पंढरपूरकडे जाणाऱ्या मार्गावर ( Mohol Pandharpur road accident ) सारोळे पाटीजवळ रस्त्याच्या कडेला ट्रक (एमएच 12 एफझेड 7377) थांबला होता. या थांबलेल्या ट्रकला भरधाव वेगात आलेल्या कारने जोराची धडक ( Car hit parked truck ) दिली. या धडकेत दोन जण जागीच ( two killed in accident ) ठार झाले आहेत.

दयानंद बेलाळे
दयानंद बेलाळे

By

Published : Apr 4, 2022, 8:41 PM IST

Updated : Apr 4, 2022, 10:40 PM IST

सोलापूर - मोहोळ-पंढरपूर मार्गावर सारोळे पाटीनजीक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात ग्रामीण पोलीस दलातील पोलिसाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. दयानंद बेलाळे असे मृत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

थांबलेल्या कारला धडक-
मोहोळहून पंढरपूरकडे जाणाऱ्या मार्गावर ( Mohol Pandharpur road accident ) सारोळे पाटीजवळ रस्त्याच्या कडेला ट्रक (एमएच 12 एफझेड 7377) थांबला होता. या थांबलेल्या ट्रकला भरधाव वेगात आलेल्या कारने जोराची धडक ( Car hit parked truck ) दिली. या धडकेत दोन जण जागीच ( two killed in accident ) ठार झाले आहेत. तर एक जण जखमी झाला आहे. या अपघातात सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी दयानंद बेलाळे हे ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर मोहोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपचारासाठी माेहोळ येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे.

अपघात
Last Updated : Apr 4, 2022, 10:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details