बंगळुरु- कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यामध्ये उभ्या कंटेनरला कार धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश आहे. कारमधील सर्वजण तिरुपतीला दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन माघारी येत असतानास सावळगी गावाजवळ हा अपघात झाला.
वाचा - मध्यप्रदेशमध्ये महामार्गावर झालेल्या अपघातात लातूरच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
सावळगी गावाजवळ रस्त्याच्या कडेला एक कंटेनर उभा केला होता. त्यावर जाऊन कार आदळली. संजय चडचण(२९), राणी चडचण (२६), भाग्यश्री (२२), श्रेया( ३) आणि धिरज अशी अपघातील मृतांची नावे आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्या तिघांना कलबुर्गी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमधील सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील आहेत.
वाचा - शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहनाने चिरडले; एकाचा मृत्यू, 5 जखमी