सोलापूर - सोलापुरातील सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी जवळपास 43 लाख 66 हजार रुपयांचा गांजा जप्त ( Cannabis Seized In Solapur ) केला आहे. पेट्रोलिंग करताना पोलिसांनी इनोव्हा कारची तपासणी केली. त्यामध्ये संशयीत आरोपींनी वेगवेगळ्या पोत्यांत गांजा भरून ठेवला होता. सांगोला पोलिसांनी इनोव्हा कार, गांजा, मोबाईल असा एकूण 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी संग्राम मलाप्पा पुजारी ( रा. पुसेगाव भवानी नगर, ता. खटाव जि. सातारा यास अटक केली आहे. यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल ( Filed an offense under NDPS ) केला आहे.याबाबत अधिकृत माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.
पेट्रोलिंग करताना इनोव्हा कार आढळली -सांगोला पोलिस ठाण्यातील बिट मार्शल कल्याण ढवणे, सुनील लोंढे 8 जुलै रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी महुद बुद्रुक ते दिघंची जाणाऱ्या मार्गावर सांगोला रोडच्या कडेला एमएच ४३ एजे २३२७ ही सिल्व्हर रंगाची इनोवा गाडी अंधारात थांबलेली दिसली. या इनोव्हा कारच संशय आल्याने पोलिसांनी गाडी चालकास आवाज दिला. मात्र, चालकाने गाडी सुरू करत दिघंचीकडे सुसाट वेगाने धान घेतली.
पाठलाग करून इनोव्हा कार ताब्यात घेतली -पोलिसांनी त्याचा पाठलाग करून सदरचे वाहन पकडले. त्यातील चालकाकडे नाव विचारले असता त्याने संग्राम मलाप्पा पुजारी (रा. पुसेगाव भवानी नगर, ता. खटाव, जि. सातारा, मुळ रा. मारुती नगर, मुद्देबिहाळ, ता. मुद्देबिहाळ, जि. विजापुर, राज्य-कर्नाटक) असे नाव सांगीतले. त्याच्याकडे सदर वाहनामध्ये काय आहे याबाबत विचारपूस केली असता त्यामध्ये ०९ पोती असून त्यात गांजा असल्याचे पोलिसांना सांगितले.