सोलापूर -कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरू असलेल्या लढाईत कॅनरा बँकेनेदेखील पुढाकार घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या चार मशीन सिव्हिल हॉस्पिटलला कॅनरा बॅंकेने दान दिल्या आहेत. सोलापुरातील वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या मशीनचा मोठा उपयोग होणार आहे. कॅनरा बॅंकेने दिलेल्या या मशिनमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत मिळणार असल्याचे डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले आहे.
सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णांवर उपचार करत असताना काही अडचणीचा सामना देखील शासकीय रूग्णालयाला करावा लागत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटरची कमतरता आहे. अशा परिस्थितीमध्ये कॅनरा बॅंकेने मदतीचा हात पुढे करत सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलल चार मशीन दान केल्या आहेत. कॅनरा बँकेच्या क्षेत्रीय कार्यालय, सोलापूरकडून शनिवारी चार बायपोलार रेस्पिरेटरी मशीन देण्यात आल्या. या ही मशीन कोरोना पेशंटला कृत्रिम श्वासोच्छवास घेण्यास मदत करणारी आहेत. सात लाख रुपये किमतीचे मशीन सामाजिक दायित्व म्हणून देण्यात आलेली आहेत.