सोलापूर :माणूस जीवनाच्या शाळेमध्ये आयुष्यभर शिकत असतो,तर शिक्षण क्षेत्रामध्ये साधारण तो 25 ते 30 वर्षापर्यंत अभ्यास करून परीक्षा देत असतो. पण काही लोक नियमाला अपवाद असतात. सोलापुरच्या काळे बाई अशाच काही नियमाला अपवाद आहेत. विद्या काळे (Vidya Kale at Solapur) यांनी आयुष्यातले 40 वर्ष शिक्षकेची नौकरी केली. सेवानिवृत्तीनंतर पंधरा वर्षाचे आयुष्य मनासारखे जगल्या. मात्र त्यांच्यातील विद्यार्थीनी त्यांना स्वस्थ बसु देत नव्हती. त्यामुळे वयाच्या 74 (74 year old grandmother) व्या वर्षी पुन्हा सोलापूर विद्यापीठाच्या, नाट्यशास्त्र विभागामध्ये; दुसऱ्या वर्षीच्या परीक्षा त्या देत आहेत. ज्या वयात आयुष्याची संध्याकाळ असते, त्या वयात शिकणाच्या जिद्दीची दुसरी गोष्ट म्हणजे तरुण आजी विद्या काळे. विद्या काळे यांनी नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) नाट्यशास्त्र विभागाच्या (drama exam) द्वितीय वर्षाची परीक्षा दिली आहे.
लहानपणापासूनच नाट्यशास्त्राची आवड :विद्या काळे यांना सर्वजण बाई या नावाने ओळखतात. बाईंना नाट्य क्षेत्राची आवड लहानपणापासूनच होती. बाईंना कलेचा वारसा आई आणि वडिलांकडून मिळाला. बाईंचे विद्यार्थी आज उच्च पदावरती कार्यरत आहेत. त्यांनी शालेय नोकरीमध्ये नाट्य क्षेत्रांमध्ये, विद्यार्थ्यांना दिलेल्या संधीचा फायदा, त्यांच्या विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना मधील लॉकडाऊनच्या काळामध्ये बाईंना विरंगुळा म्हणून शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण झाली. कोरोणा काळामध्ये सर्व शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू होते. ज्या वयामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांना दिसत नाही, वाचता येत नाही. त्या वयामध्ये बाई आपल्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आपले शिक्षण घेत होत्या.आतापर्यंत आजीने एम. ए.बी एड, संगीत, नाट्य, क्रीडा क्षेत्रात ही चांगले यश मिळवले आहे.