महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अक्कलकोट तालुक्यात बैलगाडीच्या शर्यती; जिल्हाधिकारी अनभिज्ञ

करजगी येथे वटपौर्णिमा निमित्त बैलगाड्याच्या शर्यती आयोजित केल्या होत्या. महाराष्ट्र राज्यात बैलगाडी शर्यती घेण्यासाठी बंदी आहे, तरी देखील करजगी येथे बैलगाडी शर्यती घेण्यात आल्या.

By

Published : Jun 24, 2021, 9:01 PM IST

bull cart race organised in Karajgi on the occasion of vat savitri purnima
अक्कलकोट तालुक्यात बैलगाडीच्या शर्यती; जिल्हाधिकारी अनभिज्ञ

सोलापूर- अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे वटपौर्णिमा निमित्त बैलगाड्याच्या शर्यती आयोजित केल्या होत्या. महाराष्ट्र राज्यात बैलगाडी शर्यती घेण्यासाठी बंदी आहे, तरी देखील करजगी येथे बैलगाडी शर्यती घेण्यात आल्या. परंतु अक्कलकोट पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना किंवा सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत काहीही माहिती नाही.


सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल-
अक्कलकोट तालुक्यातील करजगी या गावात बैलांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. या शर्यतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बैलांच्या शर्यती कोण आयोजित करतात किंवा कुणाच्या आशिर्वादाने आयोजित केल्या जातात, याचा तपास लावणे गरजेचे आहे. बैलांच्या शर्यतीला सरकारने बंदी घातलेली असताना देखील आज गुरुवारी या शर्यती झाल्या.

अक्कलकोट तालुक्यात बैलगाडीच्या शर्यती
सर्वोच्च न्यायालयाने प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली आहे -तामिळनाडू येथील जलीकट्टू या बैलांच्या खेळावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती. त्यांनतर देशभरात बैलांच्या शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे.

बैल हा प्राणी शर्यतीसाठी नाही -
मुळात बैल या प्राण्याची शरीररचना कष्टाची कामे आणि ओझे वाहण्यासाठी बनलेली आहे. घोड्या सारखे पळण्याची कला नाही. त्यामुळे शर्यतीमध्ये बैलांचा वापर करणे म्हणजे त्यावर अत्याचार केल्यासारखे आहे. यापूर्वी कोर्टात देखील अशा अनेक याचिका प्रलंबित आहेत. बैलांच्या शर्यतीला कोणतीही अधिकृत परवानगी नाही. तरी देखील ग्रामीण भागात बैलांच्या शर्यती घेतल्या जातात. आज गुरुवारी सकाळी करजगी गावात येथे झालेल्या बैलांच्या शर्यती घेणाऱ्या आयोजकांवर किंवा ग्रामस्थांवर गुन्हा दाखल होतो याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा -विठ्ठल कोणाला पावणार? अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून 'या' नेत्यांच्या नावांची चर्चा

हेही वाचा -'सोलापूर स्मार्ट सिटीच्या चमत्काराला जगातच तोड नाही, पिण्याच्या पाईपलाईनवरच बांधले ड्रेनेज चेंबर'

ABOUT THE AUTHOR

...view details