पंढरपूर : के चंद्रशेखर राव आज पंढरपूर दौऱ्यामध्ये आले आहेत. त्यांनी विठ्ठल दर्शन घेतले आहे. ते भगीरथ भालके यांच्या जाहीर पक्ष प्रवेशासाठी सुद्धा जाणार आहेत. त्यामुळे मोठी चर्चा महाराष्ट्रात होत आहे. ते नक्की महाराष्ट्रात कशासाठी आले आहेत, यावर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रावर विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे के चंद्रशेखर राव सातत्याने महाराष्ट्रात येऊन भाजपाची बी टीम म्हणून काम करतात, अशी टीका होत आहे. यावर आता केसीआरचे नेते संतोष माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केसीआर का महाराष्ट्रात येत आहे? याचे उत्तर सुद्धा त्यांनी दिलेले आहे.
विकासाचे नवीन मॉडेल : तेलंगणा राष्ट्र समितीने एक विकासाचे नवीन मॉडेल तयार केलेले आहे. भारताच्या सर्वसामान्य नागरिकांना ते जगण्यासाठी चांगले आहे. त्याचाच प्रसार करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आमचे सगळे मंत्री, आमदार विठ्ठलाच्या दर्शनाला येणे ही काही चूक नाही. आमच्या विकासाचे मॉडेल आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत. जनता आम्हाला स्वीकारेल, असा आम्हाला विश्वास असल्याचे राष्ट्र समितीचे नेते संतोष माने यांनी म्हटले आहे. ृअनेक मोठे नेते आमच्याकडे पक्षप्रवेशासाठी येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी आमची बातचीत चालू आहे. परंतु, आणखी अंतिम टप्प्यात आलेली नाही. परंतु काही मुद्द्यांवरती आम्ही चर्चा करत आहोत. यावर लवकर मार्ग निघेल असे, केसीआर शेतकरी नेते यांनी म्हटलेले आहे.