सोलापूर- फेसबुकवरून एका अल्पवयीन मुलीला आकर्षित केले. प्रथम चॅटिंग केली. त्यानंतर तिला भेटायला बोलावले. दोघांमध्ये दोन-तीन भेटी झाल्या. 4 जानेवारीला पीडित मुलीला जुळे सोलापुरातील एका खोलीत घेऊन गेले. पालकांनी पोलिसांसह ताबडतोब घटनास्थळी धाव घेत मुलीला वाचविले आणि साकीब शाकिर कुरेशी (वय 20 वर्षे, रा. सोलापूर) यास पोलिसांच्या स्वाधीन केले. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणे आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न करणे तसेच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. साकीब कुरेशीला मदत करणाऱ्या विनय कुलकर्णी (वय 45 वर्षे, रा. सोलापूर) यास देखील अटक करण्यात आले आहे.
फेसबुक फ्रेंडचा प्रताप
साकीब कुरेशी याचा शहरात मटण विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने पीडित मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पीडित मुलीही रिक्वेस्ट स्वीकारली. यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरू झाले. काही महिन्यानंतर दोघांत भेटी सुरू झाल्या. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर 4 जानेवारीला साकीब कुरेशीने जुळे सोलापुरातील एका इमारतीत खोलीची सोय केली. पीडितेला त्या ठिकाणी घेऊन गेला. अत्याचार सुरू करण्यापूर्वीच पाळत ठेवलेल्या पालकांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीला वाचविले.
साकीब कुरेशीला मदत करणाऱ्याला देखील ठोकल्या बेड्या