माढा (सोलापूर) -पोहताना शेततळ्यात बुडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 8 जुलै) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. स्वप्निल विष्णू गोरे (वय 17 वर्षे, रा. उपळाई खुर्द), असे त्या मुलाचे नाव आहे.
पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा शेततळ्यात बुडून मृ्त्यू - madha latest news
पोहताना शेततळ्यात बुडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 8 जुलै) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबात सविस्तर वृत्त असे की, स्वप्नीन हा आपल्या काका व चुलत भावासह शेततळ्यात पोहत होता. पोहून झाल्यानंतर सर्वजण शेततळ्याच्या बाहेर आले. कपडे घातल्यानंतर स्वप्नीलने पुन्हा शेततळ्यात पोहण्यासाठी उडी मारली. पण, तो बुडू लागला. ही बाब लक्षात येताच त्याच्या चुलत भावाने आरओरडा केली. लागलीच स्वप्नीलचे वडील व काका धावून आले. मात्र, तोपर्यंत स्वप्नील शेततळ्याच्या तळाशी गेला होता. गावातील काही तरुणांनी स्वप्नीलला शेततळ्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. बोबडे यांनी त्याला उपचारपूर्वीत मृत घोषित केले. स्वप्नीनले नुकतीच दहावीची परिक्षा दिली होती.
हेही वाचा -लॉकडाऊन इफेक्ट; व्हिडिओ कॉन्फरन्सने ऑनलाईन साक्षीद्वारे घटस्फोट मंजूर, कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय