सोलापूर - कुर्डुवाडी रोडवर शेंद्रीजवळ बोलेरो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वार पती, पत्नी व मुलगा जागीच ठार झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडला.
धक्कादायक! सोलापुरात बोलेरो-दुचाकी अपघात; पती पत्नीसह मुलगा ठार - सोलापूर अपघात बातमी
कुर्डवाडी-करमाळा रोडवर झालेल्या अपघातात तीघांचा मृत्यू झाला. हा अपघाता २२ ऑक्टोबरला पावणेपाचच्या सुमारास झाला.
याबाबत माहिती अशी की बोलेरो गाडीने समोरून जोरदार धडक झाली. यात मोटारसायकल जळून खाक झाली. या अपघातात सोहेल फिरोज शेख ( 6 वर्ष ), फिरोज युनूस शेख ( 36 वर्ष ) , रेश्मा फिरोज शेख (रा. बाभूळगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) अशी मृत व्यक्तीची नावे आहेत. बार्शी - कुर्डुवाडी हा रस्ता बरेच वर्षे अत्यंत खराब होता. रस्ता दुरुस्तीसाठी संपूर्ण बार्शीकरांनी रस्ता रोको आंदोलन, मोर्चे करून पाठपुरावा केला होता. त्यानंतर रस्ता दुरुस्ती झाली आहे. मात्र, रस्ता दुरुस्तीनंतर अपघाताची मालिकाच सुरुच झाली आहे. मागील महिन्यात तिसरा भीषण अपघात झाला आहे. तर इतर किरकोळ ही अपघात मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.