महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Coronavirus : सोलापूर जिल्ह्यात 66 ठिकाणी नाकाबंदी, 1 हजार 13 गुन्हे दाखल - Solapur district

सोलापूर जिल्ह्यात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 171 जणांना अटक करण्यात आली आहे.

Solapur
सोलापूर जिल्ह्यात 66 ठिकाणी नाकाबंदी

By

Published : Mar 31, 2020, 12:54 PM IST

सोलापूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नागरिकांनी येऊ नये, यासाठी 66 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच आत्तापर्यंत 1 हजार 13 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 171 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यामध्ये एकूण 66 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या दुचाकी देखील ताब्यात घेतलेल्या आहेत. यामध्ये 300 पेक्षा जास्त दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details