सोलापूर - वीजबिलांविरोधात भाजपने शुक्रवारी राज्यभरात आंदोलन केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकून राज्य सरकारचा निषेध केला. सोलापुरात झालेल्या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत धक्काबुक्की झाली. यात चार पोलीस जखमी झाले आहेत.
भाजपच्या टाळे ठोको आंदोलनात पोलिसांसोबत धक्काबुक्की - भाजपचे वीजबिलाविरोधात आंदोलन
धक्काबुक्कीत जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय शिंगाडे, पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पीएसआय देविदास करंडे, पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक गुंड हे जखमी झाले.
चार पोलीस जखमी
भाजप आमदार आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जोडबसवण्णां चौकातील महावितरण कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना रोखले. मात्र कार्यालयाला टाळे ठोकणारच अशी भूमिका घेतलेले कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. यामुळे झालेल्या धक्काबुक्कीत जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय शिंगाडे, पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पीएसआय देविदास करंडे, पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक गुंड हे जखमी झाले. दरम्यान, यावेळई पोलिसांनी घटनास्थळावरून दोन कार्यकर्त्यांनी अटकही केली.
हेही वाचा -गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण