सोलापूर - 'ग्लोबल टीचर प्राईज' मिळालेले बार्शीतील रणजितसिंह डिसले यांचा राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सन्मान केला. इतर शिक्षकांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीची कामगिरी डिसले यांची आहे.रणजितसिंह डिसले यांची विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागेसाठी शिफारस करू असं प्रवीण दरेकर यांनी यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी 1 जागेसाठी डिसले गुरुजींची शिफारस करू : प्रवीण दरेकर - undefined
डिसले गुरुजींनी 300 शाळांमध्ये उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना घरबसल्या क्यु आर कोडमाध्यमातून शिक्षणाची व्यवस्था केली. हे अतिशय अभिनंदनिय काम आहे. विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी 1 जागेसाठी डिसले गुरुजींची शिफारस करू : प्रवीण दरेकर
विधिमंडळात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार-
राज्याच्या विधिमंडळामध्ये डिसले सरांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहितीदेखील प्रवीण दरेकर यांनी दिली. डिसले गुरुजींनी 300 शाळांमध्ये उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना घरबसल्या क्यु आर कोडमाध्यमातून शिक्षणाची व्यवस्था केली. हे अतिशय अभिनंदनिय काम आहे. प्रति नोबेल समजल्या जाणाऱ्या ग्लोबर टीचर अवॉर्डमुळे संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. याबाबत विधिमंडळमध्ये अभिनंदन प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.
विधानपरिषदेच्या आमदारपदासाठी डिसले गुरुजींची शिफारस करू -
दरेकर म्हणाले की, राज्यात नुकत्याच विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूका झाल्या. यामध्ये शिक्षक नसलेला व्यक्ती शिक्षक आमदार होतो हेच देशाचे दुर्दैव आहे, अशी टीका त्यांनी केली. रणजितसिंह डिसले यांची विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागेसाठी शिफारस करू. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून शिफारशीचे पत्र देऊ असे आश्वासन विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी दिले.