सोलापूर -शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. त्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली. भाजपाच्या वतीने सोमवारी राज्यभरात आंदोलन झाले. अक्कलकोटमध्ये देखील भाजप महिला आघाडीच्या वतीने सोमवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
भाजप महिला आघाडीच्यावतीने राज्य सरकारविरोधात आंदोलन - महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. त्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यात यावी, यासाठी आज शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
सोलापूर
महिला आघाडीच्या नेत्यांनी सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांना निवेदन दिले. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, अध्यक्ष विक्रम देशमुख, महिला आघाडी अध्यक्षा इंदिरा कुडक्याल, प्रा. मोहिनी पतकी, महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्या शोभा नष्टे, महिला सरचिटणीस डॉ. प्राची हुलसूरकर आदींची उपस्थिती होती.