महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवैध धंद्यावर कारवाईच्या मागणीसाठी करमाळ्यात भाजपाच्यावतीने उपोषण - Karmala Latest News

तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहेत. मात्र पोलिसांकडून कारवाई होत नाही. तसेच खोटे गुन्हे देखील दाखल केले जातात. असा आरोप करमाळा भाजपच्यावतीने करण्यात आला आहे. अवैध धंद्यांवर कारवाईच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

demanding action on illegal trade, Karmala
अवैध धंद्यावर कारवाईच्या मागणीसाठी उपोषण

By

Published : Nov 7, 2020, 4:19 PM IST

करमाळा (सोलापूर) -तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहेत. मात्र पोलिसांकडून कारवाई होत नाही. तसेच खोटे गुन्हे देखील दाखल केले जातात. असा आरोप करमाळा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी भाजप आणि समविचारी संघटनांकडून आजपासून तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

अवैध धंद्यावर कारवाईच्या मागणीसाठी उपोषण

करमाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध-धंदे सुरू आहेत. पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जी व्यक्ती गुन्ह्याची माहिती देते, त्यावरच खोटा गुन्हा दाखल केला जातो, असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी तातडीने अवैध धंद्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी भाजपने शुक्रवारपासून तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे या आंदोलकांनी सांगितले. याबाबत आंदोलकांकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील देण्यात आले आहे. तालुक्यातील अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details