महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आपल्याच पक्षाचे चिन्ह विसरले; 'कमळा'ऐवजी म्हणाले 'घड्याळा'ला मत द्या - leader

रणजितसिंहांची ही चूक उपस्थितांमध्ये हशा पिकवून गेली. पण सोशल मीडियावर ते टीकेचे धनी बनले आहेत.

रणजितसिंह मोहिते-पाटील

By

Published : Apr 14, 2019, 10:25 AM IST

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांच्या सहवासात राहिलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या जिभेला घड्याळ या शब्दाची सवय झाली. ते आता भाजपवासी झाले तरी घड्याळ त्यांची पाठ सोडत नाही. युतीच्या व्यासपीठावर त्यांनी चक्क घड्याळाला मत देण्याचे आवाहन केले. चूक लक्षात येताच उपस्थितांची माफी मागितली.

रणजितसिंह मोहिते-पाटील


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमधून बंड करत रणजितसिंहांनी भाजपत प्रवेश केला. पण अजून त्यांना भाजपच्या कमळाची म्हणावी तशी सवय झालेली नाही. म्हणून काल एका सभेत त्यांनी कमळाऐवजी घड्याळाला मत द्या, असे आवाहन केले. रणजितसिंहांची ही चूक उपस्थितांमध्ये हशा पिकवून गेली. पण सोशल मीडियावर ते टीकेचे धनी बनले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details