महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाविकास आघाडी अनैसर्गिक सरकार, भाजपला राज्य सरकार पाडण्याची गरज नाही - प्रवीण दरेकर - प्रवीण दरेकर बातमी

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अनैसर्गिकरित्या बनलेले आहे. त्यामुळे सत्तेत तग धरु शकत नाही. म्हणून महाविकास आघाडी सरकार पाडण्याची भाजपला गरज नाही, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

By

Published : Jul 15, 2021, 4:27 PM IST

Updated : Jul 15, 2021, 8:01 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याची भारतीय जनता पक्षाला गरज नाही. राज्य सरकारमध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ काय चालू आहे. हे सर्वांना दिसत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत. मात्र, अनैसर्गिकरित्या हे सरकार बनले आहे. अशाप्रकारच्या अनैसर्गिक सरकार सत्तेत तग धरू शकत नसल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केली आहे.

बोलताना प्रवीण दरेकर

माळशिरस तालुक्यातील अकलूज, नातेपुते व माळीनगर ग्रामपंचायतचे नगरपालिका व नगरपंचायतमध्ये रुपांतर व्हावे, म्हणून ग्रामस्थांच्यावतीने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे चोवीस दिवसांपासून अकलूज साखळी उपोषण सुरू केले आहे. मात्र, अद्यापही राज्य सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अकलूज येथे आले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर मोठा हल्लाबोल केला.

राज्य सरकारकडून राजकीय सुडातून माळशिरस तालुक्यात अन्याय

सरकार हे राज्यातील जनतेचे मायबाप सरकार असते. मात्र, गेल्या 24 दिवसांपासून अकलूज येथे नगरपालिका व नगरपंचायत करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ साखळी पद्धतीने उपोषण करत आहेत. मात्र, त्याकडे राज्य सरकार राजकारण करताना दिसत आहे. राज्य सरकारच्या हातातून बारामती तालुक्यातील गावांचे नगरपंचायत होऊ शकतात तर अकलूज, नातेपुते व माळीनगर का होऊ शकत नाही, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला. त्यामुळे राजकीय सुडातून राज्य सरकार वागत असल्याची खरमरीत टीका दरेकर यांनी राज्य सरकारवर केली

अकलूज नातेपुते येथील जनता आक्रमक झाल्यास राज्यसरकार जबाबदार

अकलूज येथील जनता गांधीजींच्या मार्गाने गेल्या 24 दिवसांपासून आंदोलन करत आहे, तरी अद्यापही राज्य सरकारकडून त्याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर अकलूज, नातेपुते येथील जनता आक्रमक झाली तर त्या आक्रमणाला राज्य सरकार स्वतः जबाबदार असेल, असा इशारा विरोधी पक्षनेते दरेकर यांनी दिला आहे.

हेही वाचा -राज्यमंत्री बच्चू कडूंचा सोलापुरातील दिव्यांग नयनाला फोन, व्यथा ऐकून गहिवरले

Last Updated : Jul 15, 2021, 8:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details