सोलापूर -महाराष्ट्र राज्यात हे चालणार नाही,असे त्या म्हणाल्या.महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नोटीस पाठविली आहे,त्यावर चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे, मला अशा 56 नोटिसा आल्या आहेत. त्यात काही विशेष नाही, त्याला आम्ही उत्तर दिलं आहे. महिला अयोगात या एकट्या नाहीत असे म्हणत चित्रा वाघ ( Chitra Wagh criticizes Rupali Chakankar ) बरसल्या. त्यांना दिलेलं उत्तर ही महिला आयोगाने प्रसिद्ध करावं असं चित्रा वाघ म्हणाल्या.
बाईचा कान टोचा -सुप्रिया सुळेंनी देखील या वादात उडी घेत चित्रा वाघ यांवर बोलले होते,त्याबाबत चित्रा वाघ यांनी परखड मत मांडत,रुपाली चकणकर या बाष्कळ विधान बोलत आहेत,त्यांना सांगा. सुप्रिया सुळेंना मान्य आहे का? रस्त्यावर नंगा नाच सुरू असलेल. आमची भूमिका हे आहे की,उर्फी जावेदच हे नंगा नाच आम्ही मान्य करणार नाही. राज्यात सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणावर त्यांनी संधान साधत अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली राज्यामध्ये सैराचार नंगानाच सुरू असून या विरोधात बोललले तर नोटीस पाठवता ही कसली पद्धत.पहिल्यांदा आपल्या बाईचे कान टोचा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची संस्कृती नाही असे सांगताना विरोधकांसह महिला आयोगावर देखील टिकास्त्र सोडले.